महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले

अमरावती (१)
गवळीगड(गाविलगड) (उंची ११०० फुट)

हा किल्ला चिखलदऱ्याजवळ, मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधे आहे. १२ व्या / १३ व्या शतकात गवळ्यांनी बांधलेला हा किल्ला नंतर बलाढ्य गोंडानी घेतला. गाविलगड हा वैभवशाली बांधकाम असलेला किल्ला विदर्भाचे भूषण आहे. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारचा असून तो अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यामध्ये आहे.



अहमदनगर (३)
अहमदनगरचा भुईकोट किल्ला (उंची ६५७ मी)

अहमदनगरजवळचा हा भुईकोट किल्ला हा हुसेन निझामशाह यांनी इ.स. १५५३ साली बांधण्यास सुरवात केली. चांदबिबीने जुलै इ.स. १६०० मध्ये युद्धात किल्ला लढवला. परंतु मोगलांनी तो जिंकला. इ.स. १७५९ साली पेशव्यांनी मोगलांकडून विकत घेतला. इ.स. १७९७ पेशव्यांनी शिंदे घराण्याच्या ताब्यात दिला. १२ ऑगस्ट इ.स. १८०३ ला तो इंग्रजी सत्तेसाठी जनरल वेलस्लीने जिंकला.

इ.स. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉ. पी.सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात. याच किल्ल्यात डॉ. प्रफुल्लचंद्र घोष यांनी ’हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन’ हा ग्रंथ शब्दबद्ध केला.

इ.स. १९४७ ला किल्ला भारत सरकारच्या सैन्यदलाच्या ताब्यात देण्यात आला.

पेडगावचा बहादूरगड

बहादुरगड हे या किल्ल्याचे प्रचलित नाव होते पण अधिकृत नव्हते त्याचे नाव पांडे पेडगावचा भुईकोट आहे gazatte मध्येही अशीच नोंद आहे. २५ मे २००८ ला इतिहासप्रेमी, संभाजीभक्तांनी या गडाचे धर्मवीरगड असे नामकरण केले आहे.

पेडगावचा किल्ला बहादुरगड म्हणून प्रसिद्ध आहे. बहादुरगड किल्ला (आता धर्मवीरगड) अहमदनगर जिल्ह्यामधील श्रीगोंदे तालुक्यामधे आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात श्रीगोंदा तालुका आहे. या तालुक्याच्या दक्षिण सीमेवर भीमा नदी वहाते. या भीमा नदीच्या उत्तरतीरावर धर्मवीरगड किल्ला आहे.

रतनगड (उंची ४३०० फुट)

१७६३ साली हा किल्ला कोळी सरदार जावजी याने ताब्यात घेतल्याची गॅझेटमध्ये नोंद आढळते. १८१८ साली रतनगड पाच विभागांचे मुख्यालय होते. राजुरची ३६ खेडी, अलंगची २२ खेडी ही सह्याद्रीच्या वरची व सह्याद्रीच्या खालची सोकुर्ली परगण्याची ६० खेडी, वाडी परगण्याची २२ खेडी, जुरुश्रोशि परगण्याची ६० खेडी होती. १८२० मध्ये कॅप्टन गॉर्डनने गड ताब्यात घेतला. १८२४ साली तो आदीवासी सेनानी रामोजी भागंरेनी गड ताब्यात घेतला.




उस्मानाबाद (२)
नळदुर्ग नळदुर्ग किल्ला हा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुक्यात आहे. नळदुर्ग हा महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यातील सर्वांत मोठा किल्ला आहे. याची तटबंदी जवळजवळ ३ कि.मी. लांब पसरलेली आहे. या तटबंदीत ११४ बुरूज आहेत. महाराष्ट्राच्या गिरिदुर्ग, जलदुर्गांबरोबरच अनेक वैशिष्ट्यपूर्ण भुईदुर्ग किंवा भुईकोट किल्ले आहेत. या भुईकोट किल्ल्यांमध्ये महत्त्वाचा असा किल्ला म्हणजे नळदुर्ग होय.
हा किल्ला कल्याणीच्या चालुक्य राजाच्या ताब्यात होता. पुढे तो बहामनी सुलतानांच्या ताब्यामध्ये आला. बहामनी राज्याची शकले उडाली व त्यातून ज्या शाह्या निर्माण झाल्या त्यामधील विजापूरच्या आदिलशहीने नळदुर्गावर कब्जा मिळवला. पुढे औरंगजेब या मोगल बादशहाने नळदुर्ग जिंकला आणि त्याची जबाबदारी हैदराबादच्या निजामाकडे सोपवली.
परंडा

परंडा किल्ला उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा शहरात स्थित आहे.हा भूईकोट किल्ला असून शहराच्या मधोमध आहे.कल्याणीच्या चालुक्याच्या काळात परिंडा (परंडा) हा एक महत्वाचा परगणा होता.बहामनी राजवटीत महमूद गवान याने तो बांधला.

हा किल्ला केव्हा बांधला गेला याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत परंतु असे समजले जाते की बहामनी सुलतानांचा वजीर महमूद गावानने हा किल्ला सुमारे १५ व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधला.इ.स. १५९९ मध्ये मुघल सैन्य अहमद नगर च्या निजाम शहाला हरवण्यात यशस्वी ठरले. जरी मुघल जिंकले असले तरी निजाम शाहीच्या सरदारांनी वयाने लहान अशा मुर्तुजा निजाम शहाच्या नावाने राज्य चालविण्याचा निर्णय घेतला आणि नवीन राजधानी म्हणून अहमद नगर च्या आग्नेयेला सुमारे ८० मैलांवर असलेल्या परंडा किल्ल्याची निवड केली. काही कालावधीसाठी परंडा राजधानी राहिली.इ.स. १६३० च्या सुमारास हा किल्ला शहाजी महाराजांच्या ताब्यात होता नंतर पुन्हा तो मुघलांकडे गेला आणि सरतेशेवटी हैद्राबादच्या निजामाकडे भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत रहिला.

हा किल्ला लष्करी वास्तुकला आणि सैन्य-अभियांत्रिकी वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे.याच किल्ल्यात प्रसिद्ध अशी 'मुलुख मैदान तोफ' होती.विजापूरच्या आदिल शहाच्या मुरार नावाच्या सरदाराने ही तोफ विजापूरला नेली.



औरंगाबाद जिल्हा (८)
  1. अंतुर किल्ला
  2. जंजाळा किल्ला
  3. तलतम गड
  4. देवगिरी-दौलताबाद
  5. भांगशीमाता गड
  6. लहूगड
  7. वेताळवाडी किल्ला (वाडीचा किल्ला)
  8. सुतोंडा

कुलाबा जिल्हा (३०)


  1. अवचितगड
  2. उंदेरी
  3. कर्नाळा
  4. कुलाबा
  5. कोथळीगड (पेठचा किल्ला)
  6. कोरलई
  7. कौला किल्ला॑
  8. खांदेरी
  9. घोसाळगड
  10. चंदेरी
  11. तळेगड
  12. तुंगी
  13. धक
  14. पेब
  15. प्रबळगड
  16. बिरवाडी
  17. भिवगड
  18. मंगळगड (कांगोरी)
  19. मलंगगड
  20. माणिकगड
  21. मानगड॑
  22. रतनगड
  23. रायगड
  24. लिंगाणा
  25. विशाळगड
  26. विश्रामगड
  27. सांकशी
  28. सागरगड
  29. सुरगड
  30. सोनगिरी


कोल्हापूर जिल्हा  (८)
  1. कलानिधीगड
  2. पन्हाळा
  3. पारगड
  4. पावनगड
  5. बावडा
  6. भूधरगड
  7. रांगणा
  8. सामानगड


गोंदिया जिल्हा (१)


  1. गोंदियाचा प्रतापगड


चंद्रपूर जिल्हा (२)
  1. चंद्रपूरचा किल्ला
  2. बल्लारशा

जळगाव जिल्हा (४)


  1. अंमळनेरचा किल्ला
  2. कन्हेरगड
  3. पारोळयाचा किल्ला
  4. बहादरपूर किल्ला


ठाणे जिल्हा (३९)


  1. अर्नाळा
  2. अलिबाग
  3. अशीरगड
  4. असावगड
  5. इंद्रगड
  6. उंबरगांव
  7. कल्याणचा किल्ला
  8. कामनदुर्ग
  9. काळदुर्ग
  10. केळवे-माहीम
  11. कोंजकिल्ला
  12. गंभीरगड
  13. गुमतारा
  14. गोरखगड
  15. जीवधन
  16. टकमक
  17. ठाणे किल्ला
  18. डहाणू
  19. तांदुळवाडी किल्ला
  20. तारापूर
  21. धारावी
  22. दातिवरे
  23. दिंडू
  24. नळदुर्ग
  25. पारसिक
  26. बल्लाळगड
  27. बळवंतगड
  28. बेलापूर
  29. भवनगड
  30. भैरवगड
  31. भोपटगड
  32. मानोर
  33. माहुली
  34. वररसोवा
  35. वसईचा किल्ला
  36. शिरगांवचा किल्ला
  37. संजान
  38. सिद्धगड
  39. सेगवाह

धुळे जिल्हा (१)

  1. सोनगीरचा किल्ला

नंदुरबार जिल्हा (१)


  1. अक्काराणीचा किल्ला (अक्राणीचा किल्ला)


नागपूर जिल्हा (६)


  1. आमनेरचा किल्ला
  2. उमरेडचा किल्ला
  3. गोंड राजाचा किल्ला
  4. नगरधन(रामटेक)(भुईकोट किल्ला)
  5. भिवगड
  6. सिताबर्डीचा किल्ला


नाशिक जिल्हा (३६)


  1. अंकाई
  2. अचलगड
  3. अंजनेरी
  4. अलंग
  5. अहिवंत
  6. इंद्राई
  7. कंक्राळा
  8. कंचना
  9. कण्हेरगड
  10. कर्‍हेगड
  11. कावनई
  12. कुलंग
  13. कोळधेर
  14. गाळणा
  15. घारगड किंवा गडगडा
  16. चांदोर
  17. जवळ्या
  18. टंकाई
  19. त्रिंगलवाडी
  20. त्रिंबक
  21. धैर
  22. धोडप
  23. पट्टा
  24. बहुळा
  25. ब्रह्मगिरी
  26. भास्करगड
  27. मार्किंडा
  28. मुल्हेर
  29. रवळ्या
  30. राजधेर
  31. रामसेज
  32. वाघेरा
  33. वितानगड
  34. हर्षगड
  35. हरगड
  36. हातगड



  1. अंजनवेल
  2. आंबोळगड (रत्‍नागिरी)
  3. आवर किल्ला
  4. कनकदुर्ग
  5. कुडाळचा किल्ला
  6. कोट कामते
  7. खारेपाटण
  8. गोवळकोट
  9. गोवा
  10. जयगड (रत्‍नागिरी)
  11. दुर्ग रत्नागिरी
  12. देवगड
  13. नांदोशी
  14. निवती
  15. पालगड (रत्‍नागिरी)
  16. पूर्णगड (रत्‍नागिरी)
  17. प्रचितगड (रत्‍नागिरी)
  18. फत्तेगड
  19. बाणकोट
  20. बांदे
  21. भगवंतगड
  22. भरतगड
  23. भवनगड
  24. भैरवगड
  25. मंडणगड
  26. मनसंतोषगड
  27. मनोहरगड
  28. महादेवगड
  29. महिपतगड (रत्‍नागिरी)
  30. यशवंतगड (रत्‍नागिरी)
  31. रसाळगड (रत्‍नागिरी)
  32. राजापूरचा किल्ला
  33. रायगड
  34. विजयगड (रत्‍नागिरी)
  35. विजयदुर्ग-घेरिया
  36. वेताळगड
  37. सर्जेकोट
  38. साठवली
  39. सावंतवाडीचा किल्ला
  40. सिंधुदुर्ग
  41. सुमारगड
  42. सुवर्णदुर्ग (रत्‍नागिरी)


सांगली जिल्हा (९)



सातारा जिल्हा (२८)

  1. अजिंक्यतारा
  2. कमळगड
  3. कल्याणगड (नांदगिरी)
  4. केंजळगड
  5. चंदन
  6. जंगली जयगड
  7. गुणवंतगड
  8. दातेगड/सुंदरगड
  9. नांदगिरी
  10. पाटेश्वर
  11. पांडवगड
  12. प्रचितगड
  13. प्रतापगड
  14. भैरवगड
  15. भूषणगड
  16. मकरंदगड
  17. मच्छिंद्रगड
  18. महिमंडणगड
  19. महिमानगड
  20. वासोटा
  21. सज्जनगड
  22. संतोषगड
  23. सदाशिवगड
  24. सुंदरगड
  25. वर्धनगड
  26. वंदन
  27. वसंतगड
  28. वारुगड
  29. वासोटा
  30. वैराटगड

सोलापूर जिल्हा (२)