सोळा महाजनपदे

सोळा महाजनपदे:




सर्वप्रथम जनपदाचा उल्लेख ब्राम्हण ग्रंथात येतो.

महाजनपदे राजधानी सध्याचा प्रदेश इतर माहिती
अंग चंपा भागलपूर, मोंघीर जिल्हा गौतम बुद्धाच्या काळापर्यंत हिची भारतातील सहा प्रमुख नगरांमध्ये गणना होत असे. येथून पूर्वेकडील सुवर्णभूमीसारख्या बृहद्‌भारतातील देशांशी व्यापार चाले. मगधाचा युवराज बिंबिसार याने या देशाचा शेवटचा राजा ब्रह्मदत्त यास ठार मारून अंगाला मगधाच्या साम्राज्यात समाविष्ट केले.
मगध राजगृह (विद्यमान राजगीर) पाटणा, गया जिल्हा याच्या सभोवार पर्वत असल्याने त्याला गिरिव्रज असेही नाव पडले होते. याचे ऋग्वेदकालीन नाव कीकट होते. गोतम बुद्धाच्या काळी येथे हर्यंक कुलातील बिंबिसार व आजातशत्रू हे राजे करीत होते. नंतर गंगेच्या काठी पाटलिपुत्र शहर स्थापिल्यावर तेथे राजधानी जाऊन राजगृहाचे महत्त्व हळूहळू कमी झाले.
काशी काशी (वाराणसी) बनारस, उत्तर प्रदेश, भारत पुरातन महाजनपद, बौद्ध जातक कथामंध्ये वर्णन
काशीच्या राजांची कोसल, मगध आणि अंग देशांच्या राजांशी वारंवार युद्धे होत. शेवटी कोसलच्या कंस नामक राजाने गौतम बुद्धाच्या कलापूर्वी काशी नगरी जिंकून आपल्या राज्यात सामील केली.